विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पिकअपची धडक, चालकासह १० विद्यार्थी जखमी

146 0

पुणे- विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकासह १० विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे आज, सोमवारी सकाळी १० वाजता घडला.

बोरीभडक (ता. दौंड ) येथून ही रिक्षा उरळीकांचनच्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. संदीप कोळपे असे रिक्षाचालकाने नाव आहे. तर अंकुश येलभारे, मानसी कोळपे, भक्ती शिंदे, वैष्णवी गव्हाणे, तनुजा कोळपे, मयुरी शिंदे, अमर शिंदे, हर्षल वाघमारे (सर्व रा. बोरीभडक (ता. दौंड ) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ९ विद्यार्थी हे महात्मा गांधी महाविद्यालयातील तर एक विद्यार्थिनी स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत आहे.

जखमी विद्यार्थ्यांवर उरळीकांचन येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व विद्यार्थी सुखरूप असून एका विद्यार्थ्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे.

Share This News

Related Post

Ganpati Visarjan

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनात DJ च्या तालावर नाचताना झाला राडा; पोरांनी ट्रॅक्टर चालकाला लाथा-बुक्क्यांनी तुडवला

Posted by - September 27, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणपतीच्या विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, त्याआधी दीड,…

“ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडीत स्वच्छता मोहीम

Posted by - September 20, 2022 0
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा मार्फत आज विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जात आहे. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आज…

१२५ डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके उडविण्यास मनाई

Posted by - October 21, 2022 0
पुणे : दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार पुणे पोलीस…

प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Posted by - June 2, 2022 0
पिंपरी – प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून आज गुरुवारी (दि. 2) डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्‍टरांनी काही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *