अभिजीत बिचुकलेंची अजब गजब मागणी ; म्हणे, ” माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा…! ” कारण ,

707 0

पुणे : सध्या अभिजीत बिचुकले हे कसबा विधानसभा पोट निवडणुकीचे उमेदवार आहेत. आपल्या अजब गजब वक्तव्यांनी नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा नवीन मागणी केली आहे. खरंतर ते निवडणुकीमध्ये ते स्वतः उभे आहेत. पण माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा अशी अजब गजब मागणी बिचुकले यांनी केली आहे.

तर झालं असं की, कसबा पोटनिवडणुकीसाठी आता प्रचाराकरिता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. दरम्यान बिचुकले आज पोहोचले ते थेट एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये यावेळी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले की,, मुख्यमंत्री साताऱ्याचे आहेत. मी पण साताऱ्याचा आहे. त्यांच्या सुनेला म्हणजे माझ्या बायकोला मुख्यमंत्री करा, सर्व प्रश्न लगेच सुटतील. माझी पत्नी मुख्यमंत्री झाल्यावर पहिला प्रश्न या विद्यार्थ्यांचा सोडवणार. ” असा दावा अभिजीत बिचुकले यांनी यावेळी केला.

आयोगाने या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मधला मार्ग काढला पाहिजे असे देखील म्हणाले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की 2023 आणि विद्यार्थी म्हणतायेत की 2025 तर मग 2024 पासूनच नवीन अभ्यासक्रम लागू करून मधला मार्ग काढावा अशी मागणी देखील यावेळी बिचुकले यांनी केली आहे.

मोठी बातमी : MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य, नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार !

Share This News
error: Content is protected !!