#SUMMERS : आला आला उन्हाळा, तब्येती सांभाळा ! ही भारतीय थंड पेय शरीराला देतील थंडावा

838 0

हळूहळू थंडी कमी होऊन आता उन्हाळा जाणवू लागला आहे. दोन ऋतू मधील हा होणारा बदल तुमच्या शरीरावर देखील परिणाम करू शकतो. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये काही शीतपेय हे तुमच्या शरीराला खूप हितकारक असतात. तुम्ही जर कोकाकोला, स्प्राईट अशी शीतपेय शरीराला थंडावा देण्यासाठी घेत असाल तर ती लगेच थांबवा. कारण अशी शीतपेय फक्त तुमच्या शरीराला अपायकारकच ठरतात. तर मग काय करा उन्हाळा खऱ्या अर्थानं सुरू होण्यापूर्वीच घरामध्ये या भारतीय शीतपेयांची तयारी करून घ्या. चला तर मग पाहूयात कोणती आहेत ही शीतपेय…

पन्ह : कैरीच पन्ह हे एक उत्तम शीतपेय आहे. उन्हाळ्यामध्ये हळूहळू कैरी मिळायला सुरुवात होईल. किंवा बाजारामध्ये तुम्हाला पन्ह सहज उपलब्ध होतं. कैरीच्या गरापासून बनवलेलं हे पेय तुम्हाला उष्माघातापासून बचावतं. विटामिन सी सारख्या अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध असलेलं हे पन्ह शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या शीतपेयाची तयारी तुम्ही करून ठेवू शकता आणि जेव्हा हे सर्व तुम्हाला बनवायचा आहे तेव्हा केवळ एक चमचा पाण्याच्या घरामध्ये एक ग्लास पाणी चवीनुसार साखर, पुदिना, जिरं आणि थोडं मीठ घालून हे पुन्हा आवश्यक प्या आणि ठणठणीत रहा.

उन्हाळ्यासाठी परफेक्ट ड्रिंक आहे बेलाचे सरबत-beat the heat with this ...

बेलाचे सरबत : उन्हाळ्यामध्ये बीटा कॅरोटीन ,प्रोटीन, व्हिटॅमिन सी, बी वन, बी टू, कॅल्शियम ,पोटॅशियम आणि फायबरने समृद्ध असलेलं हे सरबत प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बेलाचा सिरप तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल.

ताक पिण्याचे महत्त्व - तक्रं शक्रस्य दुर्लभम् ! - Maharashtra Today

ताक : ताक बाजारामध्ये सहज उपलब्ध होईलच, तर भारतीय घरांमध्ये ताक हे अगदी हमखास असतंच. ताकामध्ये तुमच्या शरीराला थंडावा देण्याची ताकद आहे. पचनासाठी देखील ताक खूप उपयुक्त आहे. तुमच्या आवडीनुसार मीठ किंवा साखर घालून तुम्ही ताक घेऊ शकता.

उसाचा रस : उसाच्या रसाने तहान तर भागतेच, त्याचबरोबर उष्माघातापासून देखील बचाव होतो. उसाच्या रसामध्ये लोह, कॅलरी आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते.

उस 'न' वापरता घरीच बनवा उसाचा रस, कसा ? या जाणून घेऊ

Share This News

Related Post

राज ठाकरे यांच्या भाषणाचा आढावा घेणार, आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्र्यांची बैठक

Posted by - May 2, 2022 0
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह खात्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा परामर्श घेण्यास सुरुवात केली आहे.…
CM EKNATH SHINDE

अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील 21 नगरसेवक आणि 2 स्वीकृत नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

Posted by - July 11, 2022 0
मुंबई: शिवसेनेसाठी आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील 21 नगरसेवक आणि नगरसेविकांसह २ स्वीकृत नगरसेवक हे…
Ravindra Shobhane

Sahitya Sammelan : अमळनेर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड

Posted by - June 25, 2023 0
पुणे : 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) अमळनेर या ठिकाणी पार पडणार आहे. या संमेलनाच्या (Sahitya…

इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या 13 वाहनांनी अचानक घेतला पेट; पुण्यातील जांभूळवाडी येथील घटना

Posted by - May 29, 2022 0
पुणे- पुण्यातील जांभूळवाडी येथील साई प्रसाद अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये तेरा वाहनांनी पेट घेतल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या…

अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई – मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळालेला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *