माजी आमदारांचे पेन्शन बंद केल्यानंतर ‘आप’ सरकारची पंजाबमध्ये नवीन घोषणा

307 0

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा एकदा पंजाब राज्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता राज्यातील जनतेला घरबसल्या रेशन मिळणार आहे. आप सरकारने ‘रेशन, आपके द्वार’ योजना सुरू केली असून, त्याद्वारे आता लोकांना घरी बसून रेशन विभाग उपलब्ध करून दिला जाणार आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंजाबमध्ये नोकरभरती सुरू करणाऱ्या भगवंत मान यांनी आज पुन्हा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. भगवंत मान सरकारने पंजाबमध्ये आता राशनची डोअर स्टेप डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे मान सरकार राज्यातील जनतेला घरपोच राशन देणार आहे. त्यामुळे पंजाबमधील नागरिकांना राशन दुकानावर रांगा लावण्याची गरज पडणार नाही. हे काम रेशनिंग अधिकारी करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी आज एक व्हिडिओ संदेश जारी केला आणि ते म्हणाले की लोकांना रेशन मिळवण्यासाठी लांबच्या रांगेत उभे राहावे लागते आणि गरीब लोकांना अनेक वेळा रेशन मिळवण्यासाठी आपली रोजची मजुरी सोडावी लागते, ज्यामुळे त्यांचे नुकसान होते. रोजची कमाई करणारा गरीब माणूस आपली रोजची मजुरी सोडण्याच्या स्थितीत नाही. कधी-कधी माता-भगिनींना दुरून रेशन आणावे लागते हे पाहिले, पण आता विभागातील लोक तुमच्या घरी रेशन देणार असा निर्णय सरकारने घेतला आहे, घरी येण्यापूर्वी घरी आहेत की नाही हे लोकांना विचारले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. पीठ आणि डाळीही तुम्हाला घरापर्यंत देऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आतापर्यंत अनेक घोषणा केल्या आहेत. माजी आमदारांचे वेगळे पेन्शन बंद केल्यानंतर त्यांच्या नव्या घोषणेबाबत चर्चा सुरू झाली होती. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणतात की, त्यांच्या सरकारच्या 10 दिवसांच्या कार्यकाळात 10 मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Share This News

Related Post

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार का ? केंद्राचे महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र

Posted by - April 20, 2022 0
नवी दिल्ली- कोरोनाने काही राज्यांमध्ये पुन्हा डोके वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड…

‘… तर अनिल देशमुख फरार होतील’, केतकी चितळेची अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका

Posted by - June 6, 2022 0
मुंबई- शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली…

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न ; औद्योगिक क्षेत्रात त्वरित ट्रक टर्मिनलची सुविधा करा-उद्योगमंत्री

Posted by - October 19, 2022 0
पुणे : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात…

TOP NEWS INFO: गुजरातसाठी ‘आप’कडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर ! कोण आहेत इसुदान गढवी ?

Posted by - November 4, 2022 0
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली. आपचे राष्ट्रीय संयोजक तसेच दिल्लीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *