Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : सेनाभवनासमोर भरधाव बाईक स्वाराची आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक

744 0

मुंबई : आज दुपारच्या सुमारास आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसेना भवनमध्ये येत असताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीला बाईकस्वाराने जोरदार धडक दिली. शिवसेना भवनच्या सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवनच्या उजव्या बाजूला वळण घेत असताना हा अपघात झाला.

यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये आल्यावर शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितली. तसंच धडक दिल्यानंतर ट्रॅफिक पोलीस, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी या बाईकस्वाराला बाजूला घेतले आणि त्याची चौकशी केली.

2018 साली राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्याआधी ठाकरे कुटुंबाला झेड सुरक्षा होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना बुलेटप्रुफ स्कॉर्पियो कार, मुंबई पोलिसांमधला एक अधिकारी आणि चार कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले होते.

Share This News
error: Content is protected !!