Modi And Kejriwal

Uniform Civil Code : समान नागरी कायद्याच्या मुद्यावर “आप”चे भाजपाला समर्थन ?

1079 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्यासंदर्भात देशात मोठा वाद पेटला आहे. आता याच कायद्याला आम आदमी पक्षाचं समर्थन मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण आम आदमी पक्षाचे महासचिव संदीप पाठक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले कि आम आदमी पार्टी समान नागरी कायद्याचे (Uniform Civil Code) तत्वतः समर्थन करते अशी माहिती दिली आहे.आर्टिकल 44 मध्ये समान नागरी कायदा असावा असं सांगितलं आहे,परंतु आपचे म्हणणे आहे की, या मुद्द्यावर सर्व धर्मांशी आणि राजकिय पक्षांमध्ये चर्चा होणे खूप गरजेचे आहे. तसेच सर्वांच्या सहमतीनेच हा कायदा लागू करण्यात यावा असे पाठक म्हणाले.

सामान नागरी कायद्याच्या मुद्यावर त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. जेव्हा निवडणूका येतात तेव्हा भाजपकडून गुंतागुंतीचे आणि अवघड विषय पुढे केले जातात. पाठक पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचा समान नागरी कायदा लागू करणे आणि हा प्रश्न निकाली काढण्याशी काहीही संबंध नाही. फक्त भाजपा देशात कन्फ्यूजन तयार करत आहे. जेणेकरून देशातील जनतेत फूट पाडता येईल आणि निवडणूका जिंकता येतील. मोदी सरकारने मागचे ९ वर्ष काम केलं असतं तर त्यांना त्यांच्या कामाचा आधार घेता आला असता, पण पंतप्रधानांना कामाचा आधार नाहीये, म्हणून ते सामान नागरी कायद्याचा आधार घेत आहेत.

Pune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला जोरदार धडक; मुलीच्या डोळ्यांदेखत आईने सोडला जीव

काय आहे सामान नागरी कायदा ?
समान नागरी कायद्याअंतर्गत (Uniform Civil Code) सर्व धर्मांसाठी आता एकच कायदा लागू करण्यासंदर्भात सध्या हालचाली सुरु आहेत. सद्या प्रत्येक धर्माचा स्वतंत्र असा कायदा आहे.प्रत्येक धर्माचा लग्न, घटस्फोट आणि संपत्तीचे वेगवेगळे कायदे आहेत. हा कायदा लागू झाल्यास धर्मियांचे प्रश्न हे सिव्हील नियमांतर्गत सोडवले जातील .सर्व धर्मियांसाठी एकच समान नागरी कायदा लागू असणार आहे. लग्न, घटस्फोट, दत्तक घेणे, उत्तराधिकारी आणि संपत्तीचा अधिकार यासंबंधिच्या कायदे सर्वांसाठी एकच असणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!