मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी : मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर 27 तासांचा मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

575 0

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे बातमी आहे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी करणार पूल पाडण्याबरोबरच कोपरी पुलाच्या कामकाजासाठी लोकलच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात येत आहेत. हा मेगा ब्लॉक आज रात्री अकरा वाजल्यापासून सुरू होतो आहे. त्यामुळे उद्यापासून मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर 27 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. “आम्ही 27 तासांचा मेगाब्लॉक कर्नाक पुल पाडण्यासाठी घेत आहोत. मात्र आम्ही मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरील सेवानिर्धारित वेळेपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न करू, आम्ही मुख्य मार्गावरील आमचं काम पूर्ण करण्याचा आणि दुपारी चार वाजेपर्यंत सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू, तसेच हार्बर मार्गावरील सेवा ही आम्ही 20 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेपर्यंत पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत” असे सांगितले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या बातमीची नोंद लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी घ्यायची आहे.

Share This News
error: Content is protected !!