Mobile

Mobile Number Suspended: सरकारची मोठी कारवाई ! 70 लाख मोबाईल नंबर केले बंद

456 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने मोठी कारवाई करत 70 लाख मोबाईल क्रमांक बंद (Mobile Number Suspended) केले आहेत. म्हणजेच या मोबाईल क्रमांकांचा वापर पूर्णपणे बंद झाला आहे. वाढत्या डिजिटल फ्रॉडच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

‘या’ कारणामुळे मोबाईल क्रमांक बंद करण्यात आले
निलंबित करण्यात आलेले मोबाईल क्रमांक कोणत्यातरी संशयास्पद व्यवहाराशी जोडलेले होते. वास्तविक, वित्त सेवा सचिव विवेक जोशी यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली. इंटरनेटच्या युगात डिजिटल पेमेंटबाबत होत असलेली फसवणूक लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी डिजिटल पेमेंट आणि संबंधित समस्यांबाबत झालेल्या फसवणुकीवरील बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.

या बैठकीला आर्थिक व्यवहार विभाग, महसूल विभाग, दूरसंचार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY), भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!