Instagram Winner : मेटा कंपनीने पैठणच्या विद्यार्थ्याला जाहीर केले 30 लाखांचे बक्षीस
सोशल मीडियावर अलिकडच्या काळात अनेक युजर्स हे हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने इन्स्टाग्रामवरील बग्स शोधून काढल्याबद्दल पैठण येथील एका विद्यार्थ्याला ३० लाखांचे बक्षीस (Instagram Winner) दिले आहे. या इन्स्टाग्राम युजर्सच्या खात्यात काही त्रुटी आल्यानंतर मार्च मध्ये इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील बग असल्याचा शोध त्याने लावला. त्यानंतर त्याने मेटा कंपनीला या बाबतची तक्रार केली