Instagram Winner : मेटा कंपनीने पैठणच्या विद्यार्थ्याला जाहीर केले 30 लाखांचे बक्षीस

1287 0

सोशल मीडियावर अलिकडच्या काळात अनेक युजर्स हे हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने इन्स्टाग्रामवरील बग्स शोधून काढल्याबद्दल पैठण येथील एका विद्यार्थ्याला ३० लाखांचे बक्षीस (Instagram Winner) दिले आहे. या इन्स्टाग्राम युजर्सच्या खात्यात काही त्रुटी आल्यानंतर मार्च मध्ये इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील बग असल्याचा शोध त्याने लावला. त्यानंतर त्याने मेटा कंपनीला या बाबतची तक्रार केली होती.

कंपनीने या समस्याचे निरसन करण्याकरिता पैठणच्या विद्यार्थ्याला आढळून येणाऱ्या त्रुटींचा डेमो शेअर करण्यास सांगितले. त्याने दिलेल्या १० मिनिटांच्या व्हिडिओ डेमोमध्ये असे दिसून आले की, कोणत्याही परवानगीविना इन्स्टाग्राम खात्यातील माहिती बदलली जात आहे. या प्रकाराचा सखोल तपास केल्यानंतर फेसबुकने १६ मार्च रोजी त्याने दिलेल्या त्रुटींची माहिती स्विकारून ३० लाखांचे बक्षीस दिले.

इन्स्टाग्राममध्ये एक त्रुटी (Bug) येत असल्याचे आढळून आले. या बग्सद्वारे युजर्सच्या परवानगी शिवाय युजर्सच्या खाजगी/संग्रहित पोस्ट, कथा, रील, IGTV चे तपशील पाहू शकला असता व खात्यातील माहिती बदलली जाते. सोशल मीडियावरील आयडीच्या पुराव्याच्या आधारे ही माहिती बदलली असती तर यामध्ये युजर्सद्वारे हे बदलले असं समजू शकलो असतो. पण या घटनेमध्ये जे घडलं ते कोणत्याही युजर्सच्या बाबतीत घडलं असते. त्यामुळे जानेवारी २०२३ पासून विद्यार्थ्याने या त्रुटीचा शोध लावण्याचा ध्यास धरला. खूप प्रयत्नानंतर १० मार्च रोजी सकाळी या त्रुटीचा (Bug) शोध लागला. त्यानंतर इन्स्टाग्राम खात्यावर येत असणाऱ्या समस्येचा शोध लागलेला अहवाल मेटा म्हणजेच फेसबुक कंपनीला पाठवला

Share This News

Related Post

AGNNIVEER : पोलीस , अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरूणांना जिल्हा प्रशासनाकडून सोयी-सुविधा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Posted by - August 30, 2022 0
मुंबई : पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात,…
Karnataka Congress

Karnataka Congress : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे काँग्रेस सरकार कोसळणार; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा दावा

Posted by - June 26, 2023 0
बेळगाव : कर्नाटकमधील काँग्रेस सरकार (Karnataka Congress) पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार…

श्रावणाची कथा : श्रावण महिन्यात कुमारिकांनी का करावा उपवास ? महादेवाला प्रिय आहे श्रावण कारण …

Posted by - August 1, 2022 0
श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो… काही जण खास करून सोमवार…

पुणे : मुरलीधर मोहोळ यांची भाजपच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकदावर नियुक्ती

Posted by - September 1, 2022 0
पुणे : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भाऱतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेता प्रवास योजना समितीच्या प्रदेश सहसंयोजकदावर नियुक्ती करण्यात…

पर्याय उपलब्ध असतात, फक्त डोळे उघडे ठेवावे लागतात ; मनसे नेते अमेय खोपकर यांचं ट्विट

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून आम आदमी पक्षाकडून पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये पदार्पणातच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *