Amravati News : वर्दीतील देव हरपला ! ड्युटी संपवून घरी जाताना महिला पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका मद्यपी दुचाकीस्वाराने धडक दिल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे समाधी मंदिरासमोर घडली आहे. या प्रकरणी आरोपी दुचाकीचालकास अटक करण्यात आली आहे. काय घडले नेमके?