नवरात्री 2022 : नवरात्रातील कुमारिका पूजनाचे का आहे महत्व ; वाचा प्रथा, पद्धत आणि महत्व

530 0

नवरात्री 2022 : नवरात्रीचा संबंध जगतजननी दुर्गा देवीशी आहे. नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते. कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते. दुनियेत स्त्री जात किंवा माता ही देवीचा अंश आहे. नवरात्रीत २ ते 10 वर्षांपर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते. यांना कुमारिका असे म्हणतात. कुमारिकांच्या पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा असते.

कुमारिकांना पाय धुऊन आसनावर बसवावे. हातावर लाल मोली बांधून कपाळावर कुंकू लावावे. प्रसाद आणि दक्षिणा द्यावी. घरातून पाठवताना पाया पडून आशीर्वाद घ्यावा. चला बघू वयाच्या कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपात असते. आणि तिचे पूजन केल्याने काय फळ मिळते ते:

दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं.

तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.

चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.

पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते जी रोगमुक्त ठेवते.

सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.

सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.

आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो.

नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचे रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.

दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

Share This News
error: Content is protected !!