VASANT MORE ON BHARAT GOGAWALE: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं नाट्य रंगताना दिसत आहे.

VASANT MORE ON BHARAT GOGAWALE: भरत गोगावलेंच्या घरात अघोरी पूजा! ‘उबाठा’च्या वसंत मोरेंचा आरोप

150 0

VASANT MORE ON BHARAT GOGAWALE: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं नाट्य रंगताना दिसत आहे.

शिवसेना नेते भरत गोगावले यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर शिवसेनेत हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप केला.

TOP NEWS MARATHI | संजय राऊतांचं ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तक वसंत मोरे यांच्या देवघरात

तर याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावर ‘अघोरी पूजा’ केल्याचा गंभीर आरोप केलाय.

Vasant More : वंचितचे वसंत मोरे लढणार ‘रोड रोलर’ चिन्हावर

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची फैर पुन्हा एकदा झडताना दिसतेय.

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी नुकतंच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर शिवसेनेत थेट राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला.

शिवसेना एकत्र असताना रश्मी ठाकरे यांचं पक्षकार्यात मोठं हस्तक्षेप होता. त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच होत नव्हतं.

Vasant More : वसंत मोरे यांच्या विविध नेत्यांसोबतच्या भेटीत नेमकं होतं तरी काय ? TOP NEWS ची INSIDE STORY

आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद मिळणं हा देखील त्यांचाच हट्ट होता.एवढंच नाही, तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने अनेक आमदार नाराज झाले आणि त्यातूनच उठाव झाला,

असंही मंत्री भरत गोगावले म्हणाले..मात्र याला प्रत्युत्तर देताना पुण्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
“18 ऑक्टोबर 2024 रोजी भरत गोगावले यांनी त्यांच्या घरात उज्जैनच्या बागलामुखी मंदिरातून महाराज बोलावून अघोरी पूजा केली होती.

Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट

त्यासाठी 11 महाराज आणले होते. आमच्याकडे त्या पूजेचे व्हिडीओ पुरावे आहेत.

आणि हे सगळं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे देणार आहोत. असंही वसंत मोरे म्हणालेत.

राजकीय आरोपांमध्ये आता अंधश्रद्धेचा अँगलही समोर आला आहे.या गंभीर आरोपांवर मंत्री भरत गोगावले काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!