भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसीय महाविजयी प्रदेश अधिवेशन दिल्लीत सुरू असून या अधिवेशनातून एक मोठी बातमी समोर आली असून माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी होत आमदार झाले असून एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे जबाबदारी सांभाळले आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र चव्हाण यांना संधी न मिळाल्याने त्यांचे प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागेलं या चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र अखेर त्यांची कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने रवींद्र चव्हाण हेच भाजपचे पुढचे प्रदेशाध्यक्ष असतील हे जवळपास निश्चित झाला आहे.