attack

पती-पत्नीचे झाले भांडण ; पतीने रिव्हॉल्व्हरमधून झाडलेली गोळी लागली थेट 8 वर्षाच्या चिमुकलीला ; पुण्यातील ‘तो’ बांधकाम व्यवसायिक पोलिसांच्या ताब्यात

622 0

पुणे : पुण्यामध्ये शुक्रवारी रात्री एक धक्कादाय घटना घडली. पती-पत्नीचे भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, पतीने पत्नीवर थेट बंदूक उगारली. हे पाहून त्यांची आठ वर्षाची मुलगी भांडण थांबवण्यासाठी मध्ये पडली खरी, पण तिच्याच वडिलांनी झाडलेली गोळी तिच्या छातीच्या उजव्या भागामध्ये लागली आहे. यामध्ये ही चिमुकली जखमी झाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, हे घटना पुण्यातील नऱ्हे या भागातील हेरंब हाइट्स मध्ये घडले आहे. व्यवसायाने बांधकाम व्यवसायिक असलेले पांडुरंग तुकाराम उभे हे सध्या आर्थिक नुकसानीमुळे चिंतेत होते. यातूनच शुक्रवारी रात्री दारू पिऊन आल्याच्या कारणावरून त्यांचे त्यांच्या पत्नीशी जोरदार भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले, की त्यांनी खाजगी रिव्हॉल्व्हर मधून थेट पत्नीवर गोळी देखील झाडली. या हल्ल्यातून पत्नी वाचली खरी पण नेमकी ही गोळी त्यांच्या आठ वर्षाच्या मुलीला लागली.

गोळी लागल्यानंतर ही चिमुकली जमिनीवर कोसळली. आवाज ऐकून आजूबाजूचे देखील घराकडे धावले आणि या चिमुकलीला तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. सध्या या चिमुकलीवर एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. परंतु दारूच्या नशेत स्वतःच्याच कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणारा बांधकाम व्यावसायिक पांडुरंग उभे यास पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!