पुणे : पुणे शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा येत्या रविवारी 11 सप्टेंबर रोजी बंद राहणार आहे. लोहगाव, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, फुलेनगर, येरवडा या परिसराचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार आहे.पुणे शहरातील भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती कामांमुळे या अखत्यारीत येणार्या भागांचा पाणीपुरवठा रविवारी 11 सप्टेंबर रोजी बंद असेल.
तर, सोमवारी 12 सप्टेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.