गंधर्व सुरावटीत होणार पहिल्या “ कोथरूड गणेश फेस्टिव्हल ” चे उदघाटन

321 0

पुणे : कोथरूड या वेगात विकसित झालेले उपनगराची एक सांस्कृतिक ओळखही तयार होत आहे. निर्बंधमुक्त वातावरणात होणा-या यंदाच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवात, सांस्कृतिक कोथरूड ही ओळख अधिक ठळक करणा-या “पहिल्या कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे” आयोजन कऱण्यात आलेले आहे. या फेस्टिव्हलचे उदघाटन आनंद गंधर्व म्हणजेच पंडित आनंद भाटे यांच्या अभंग नाट्यसंगीतांच्या सुरावटीने होणार आहे. फेस्टिव्हलचे उदघाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दि. 1 सप्टेंबरला, सायंकाळी 5 वाजता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी महिती या फेस्टिव्हलचे संयोजक संवाद पुणेचे सुनील महाजन, सचिन ईटकर आणि ऍड मंदार जोशी यांनी दिली. सांस्कृति कोथरूड ही ओळख ठळकपणे अधोरेखीत करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन आम्ही कोथरूडकर आणि संवाद पुणे यांनी केले आहे.

कोथरूड गणेश फेस्टिव्हलच्या उदघाटन समारंभाराची सुरूवात शिल्पा दातार आणि सहका-यांनी सादर केलेल्या गणेश वंदनाने होईल. त्यानंतर शृगांली परांजपे आणि सहकारी जयोस्तुते आणि कथ्थक – लावणी यांची जुगलबंदी निकिता मोघे दिग्दर्शित अभिनेत्री डॉ. तेजा देवकर व लावणी सम्राज्ञी अभिनेत्री वैशाली जाधव सादर होईल. त्यानंतर फेस्टिव्हलचे औपचारिक उदघाटन होईल. या उदघाटन समारंभासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार,सौ मंजुश्री खर्डेकर, मा. राजेश पांडे ,दीपक मानकर, राजेश बराटे, बंडू केमसे,दिलीप वेडेपाटील, सौ. कांचन कुंबरे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, महिला गृहउद्योगचे सुरेश कोते, दैनिक राष्ट्रसंचारचे संपादक अनिरूद्ध बडवे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

फेस्टिवलमधील कार्यक्रमांची महिती देताना सुनील महाजन, सचिन ईटकर, ऍड. मंदार जोशी यांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवात 1 आणि 2 सप्टेंबर असे दोन दिवस हा फेस्टिव्हल होणार असून त्यातील सर्व कार्यक्रमांचा रसिकांना विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे. उदघाटन समारंभानंतर पंडित आनंद भाटे यांचा भजन आणि नाट्यसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक २ सप्टेंबर देवाषिश फाऊंडेशनच्यावतीने दुपारी 1 वाजता खास फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव होणार आहे. या लावणी महोत्सवासाठी कांचन कुंबरे प्रमुख अतिथी असतील.

ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त सायंकाळी 5 वाजता त्यांना आदरांजली वाहणारा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कवयित्री मनिषा निश्चल यांना शांताबाई शेळके पुरस्कार देऊन गौरव कऱण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले व सूर्यदत्त इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी असतील. त्यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान करण्या येणार आहे.

कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये दि. 2 सप्टेंबरला रात्री 9.30 वाजता चव्हाण नाट्यगृहात होणा-या “वाटेवरचे मुशाफिर” ही स्वरचित कवितांची मैफल रंगणार आहे. संवेदनशील कवी किशोर कदम यांना यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. या मैफलीतच किशोर कदम यांना गौरविण्यात येणार आहे. या मैफलित वैभव जोशी. संदीप खरे. किशोर कदम, विजय चोरमारे, आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे कविता सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज कॉ. सोसायटी व्यवस्थापक सुशील जाधव प्रमुख पाहुणे असतील. या पहिल्या कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम यशवंतरा चव्हण नाट्यगृहात होणार असून ते रसिकांसाठी खुले (मोफत) आहेत.

Share This News
error: Content is protected !!