पुणे : येरवडा कारागृहातल्या कैद्यांनी गणेश उत्सवानिमित्त या गणपती मुर्ती साकारल्या आहेत. जेल शोरूम विक्री केंद्र या ठिकाणी सामान्य नागरिकांना खरेदीसाठी या मुर्त्या ठेवण्यात आल्या आहेत.
ज्या हातांनी कधी काळी गुन्हे घडले त्याच हातांनी या सुंदर… सुबक आणि देखण्या गणेश मूर्ती साकारल्या आहेत. कैद्यांनी बनवलेल्या या मुर्ती सगळ्या पर्यवरणपूरक शाडू मातीच्या आहेत. या वर्षी करोना निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र, या वर्षी महागाई मध्ये वाढ झाल्यामुळे यंदा गणेश मूर्ती महाग झाल्या आहेत.
मात्र येरवडा कारागृहातील कैद्यांनी साकारलेल्या मूर्तींच्या किमती बाजारातल्या मुर्तीपेक्षा स्वस्त आहेत. कधी काळी ज्या हाताने गुन्हा घडवला होता तेच हात आता एवढ्या सुंदर संकल्पना साकारतील कधी कैद्यांना वाटलं नव्हतं. कैद्यांच्या हाताशी काम मिळावं आणि ते वेगळ्या अजून काही उपक्रम साकाराव हाच एक उद्देश याचा मागे आहे.