‘ते’ मेसेज चुकून पाठवले ; पालिका आयुक्तांची दिलगिरी ! मिळकतकराची 40% सवलत कायम ठेवण्याची ‘सजग’ची मागणी… पाहा

225 0

पुणे : मालमत्ता कराच्या वाढीव बिलांच्या मेसेजबद्दल फक्त दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही तर ज्या पत्राच्या आधारे शासनानं 40% सवलत रद्द केली ते पत्र नव्याने लिहून 40% सवलत कायम ठेवण्याची मागणी सजग नागरिक मंचच्या वतीनं पुणे महापालिका आयुक्त आणि सध्याचे प्रशासक विक्रम कुमार यांना करण्यात आलीये.

अधिक वाचा : अफझल वधाच्या देखाव्याला परवानगी मिळावी ; हिंदू महासंघाचं कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदन

पुणे महापालिकेनं मिळकतकराची 40 टक्के सवलत रद्द झाल्याचे 60 हजार मेसेज एकाच दिवशी नागरिकांना पाठवल्यानंतर प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जातोय. असे असतानाच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे मेसेज चुकून पाठवण्यात आले आहेत, नागरिकांनी पैसे भरू नयेत, प्रशासनाकडून याबाबत लवकरच शुद्धीपत्रक काढले जाईल, असं स्पष्ट करून सारवासारव केली आहे. राज्य शासनानं पुणे महापालिकेच्या मिळकतकरातील 40 टक्के सवलत रद्द करावी, अशा मागणीचं पत्र महापालिकेतर्फे राज्य शासनाला पाठवण्यात आलं होतं. एक नजर टाकूयात या पत्रावर महापालिकेनं ज्या नागरिकांचे दोन फ्लॅट आहेत किंवा भाडेकरू ठेवला आहे अशांची 40 टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा : पुणेकरांना मिळकतकराच्या हजारो रुपयांच्या थकबाकीच्या नोटीस ; अन्यायपूर्ण कार्यवाहीचा आदेश निलंबित करा – संदीप खर्डेकर

यासाठी दोन संस्थांकडून केलेल्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी असतानाही हा अहवाल स्वीकारण्यात आला. अहवालानुसार 97 हजार फ्लॅटधारकांची 40 टक्के सवलत काढून घेण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी 33 हजार जणांना 2019 ते 2022 या तीन वर्षांच्या फरकाची रक्कम पाठवली. त्यानंतर सोमवारी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी 60 हजार जणांना फरकाच्या रकमेचा मेसेजही पाठवला. नियमित कर भरून देखील हजारो रुपयांची थकबाकी दाखवून ती वसूल केली जात असल्यानं नागरिकांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे. या विरोधात काही जणांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडं तक्रारही केली आहे. सजग नागरिक मंचच्यावतीनं मिळकतकराच्या आकारणीत सुधारणा व्हावी यासाठी निवेदनही देण्यात आलंय.

अधिक वाचा : जागेच्या खरेदीपासून ते पूर्ण बांधकाम होईपर्यंत येणाऱ्या अडचणी ; करारनामा करताना अवश्य जाणून घ्या या गोष्टी 

Share This News
error: Content is protected !!