पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील एका गणेश मंडळाला अफजल खान वध हा ऐतिहासिक जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कारण देत हा देखावा साकारण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आता या प्रकरणावरुन राज्यभरातील राजकारण चांगलंच तापलंय यावरून पुण्यातील मंडळे सुद्धा या निर्णयाविरुद्ध आक्रमक झाले आहेत.
आज अफझल वधाच्या देखाव्याला परवानगी मिळावी या साठी आज हिंदू महासंघ ने कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. यावेळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे हिंदू महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आनंद दवे म्हणाले,संगम तरुण मंडळाचे यंदा 56 वे वर्ष आहे. यावर्षी त्यांनी अफजलखानाचा वध हा जिवंत देखावा सादर करण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी कोथरूड पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली आहे.
मात्र कोथरूड पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण देत या मंडळाला हा देखावा साकारण्यास परवानगी नाकारली आहे. केवळ बघत बसायचं आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यायच्या हा हिंदू महासंघाचा स्वभाव नाही
या मंडळांना अफझल वधाच्या देखाव्याला परवानगी मिळावी या साठी आज आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत असे आनंद दवे म्हणाले.