धक्कादायक:किरकोळ कारणातून अल्पवयीन मुलीची इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

394 0

पुणे:हडपसर परिसरातील अमनोरा पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरातील एका बारावीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार,बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून मुलीने टोकाचे पाऊल उचलले. अवंतिका कुलशेखर वय वर्षे 17 असं आत्महत्या केलेला मुलीचे नाव आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवंतिका तिचे आई-वडील आणि लहान भाऊ यांच्या समवेत अमनोरा पार्क परिसरातील एका इमारतीमध्ये राहत होती.शुक्रवारी सकाळी तिच्याच शाळेमध्ये पालक मेळाव्यासाठी आई-वडील गेले होते. तर लहान भाऊ हा शाळेमध्ये गेला होता.                                                                                                                                           घरी एकटी असताना अवंतिकाने घराचे दार लावून घेतले आणि इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर राहत्या घराच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केली आहे.अधिक तपास हडपसर पोलीस पथक करत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!