केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

93 0

नवी दिल्ली:राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती , प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची 6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 ,लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

Share This News

Related Post

बारसूतील रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट

Posted by - April 25, 2023 0
राजापूर- रत्नागिरी जवळील बारसूमध्ये नियोजित रिफायनरी प्रकल्पाला (refinery protest)ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.…
Exam

खळबळजनक ! अमरावतीमध्ये चक्क भाजपच्या माजी नगरसेवकाने फोडला पेपर

Posted by - May 20, 2023 0
अमरावती : अमरावतीमधून (Amrawati) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पेपर फुटीच्या (Paper Leak) घटना काही…

मोठी बातमी ! राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर मंगळवारी होणार सुनावणी

Posted by - May 13, 2022 0
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याबाबत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर…

आयटीआयमध्ये नवीन कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - October 14, 2022 0
पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह आजच्या काळातील मागणीच्या कौशल्याचे अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शासन आणि खासगी…

5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल ; सध्या कसं आहे पक्षीय बलाबल

Posted by - March 10, 2022 0
आज 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या कसं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *