मुंबई : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सणकून टीका केली आहे. महाराष्ट्र मध्ये सध्या अनेक समस्यांमुळे वातावरण तापलेलले असताना देखील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र शांत असल्यामुळे त्यांनी आज त्यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर त्यांना सत्तेवर आणलं आहे. जनतेत उद्रेक झाला तरी तुम्ही बोलायचं नाही… या अटीवर त्यांना सत्ता दिली. कालच्या मोर्चाची ते रत्नागिरीच्या सभेचे तुलना करत असतील तर हे लोक आमच्या पक्षात होते हे दुर्दैव आहे ! अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत जातात त्यांना एक इंजेक्शन तिथे दिलं जातं. त्यामुळे त्याची गुंगी उतरत नाही. गुंगी उतरल्याववर पुन्हा ते दिल्लीत जातात आणि इंजेक्शन घेतात, अशी टीका राऊत यांनी केली आहे.