अनेकांना ताणतणाव, सांधेदुखी, अंगदुखी, शांत झोप न येणे, त्वचा विकार अशा समस्या असतात. या सर्वांसाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. या उपायाने तुम्हाला प्राथमिक स्तरावर तरी नक्की आराम मिळेल. आणि हा उपाय तेवढाच सोपा देखील आहे.
१. तुम्हाला जर त्वचा विकार असतील जसे की चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फँगल इन्फेक्शन यासाठी केवळ तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ घालायचे आहे. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने तुमच्या त्वचेवरील हानीकारक बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होईल, तसेच खाज येणे देखील बंद होते.
२. सांधेदुखी, अंगदुखी त्रास असतील तर मिठाच्या पाण्यामध्ये काही वेळ बसून शेक घेणे खूप फायद्याचे ठरते. बाथ टब असल्यास उत्तम किंवा घरगुती मोठ्या टबाबदेखील तुम्ही बसून शेकू शकता.
३. निद्रानाश : रात्री झोप न लागणे हा त्रास अनेकांना असतो. यासाठी रात्री झोपताना अवश्य आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये मीठ घालून अंघोळ करा, आराम मिळेल.