Breaking News

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग थोरवे,उपाध्यक्षपदी ॲड. विवेक भरगुडे, ऍड लक्ष्मणराव येळे पाटील

336 0

पुणे- पुणे बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग थोरवे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी ॲड.विवेक भरगुडे आणि ॲड. लक्ष्मणराव येळे – पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे बार असोशिएशनच्या निवडणुकीत कुणाला मिळाली किती मते

ॲड. पांडुरंग थोरवे यांना २५११ मते मिळाली तर ॲड. हेमंत झंझाड ( Adv . Hemant Zanjad ) यांना १३८६ मते मिळाली.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. विवेक भरगुडे २१३९, ॲड. लक्ष्मण येळे पाटील १५५० मते मिळवून विजयी.

ॲड. चंद्रशेखर भुजबळ ९७८, ॲड. जयश्री चौधरी -बिडकर १३२५, अमेय देशपांडे ३२५ , कृष्णाजी झेंडे ४६०

सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. सुरेखा भोसले आणि ॲड. अमोल शितोळे विजयी झाले. ॲड. सुरेखा भोसले १७६८ , ॲड. अमोल शितोळे १८१९ , ॲड. पियुष राठी १५८४, ॲड. शीतल भुतडा यांना ११२५ अशी मते मिळाली.

ऑडिटर म्हणून ॲड. शिल्पा कदम बिराजदार या निवडून आल्या. त्यांना १८८५ मते मिळाली तर ॲड. अजय देवकर यांना १४४३ मते मिळाली. ॲड. सतीश शिंगडे यांना ३६४ मते मिळाली

Share This News
error: Content is protected !!