‘तू कुणाची सुपारी घेऊन आलास का ?’ अजितदादा कडाडले ! कुठे आणि कधी ?

265 0

जुन्नर- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. या निमित्त केल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरु असतानां एक व्यक्तीने त्यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यावेळी अजित पवार संतापले. ‘तू कुणाची सुपारी घेऊन आलास का ?’ अशा शब्दात त्यांनी संबंधित व्यक्तीला चांगलेच खडसावले.

शिवजयंती निमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात ढोल ताश्यांची गजरात साजरी करण्यात आली. शिवनेरी गडावर शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, गडांचे संवर्धन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे संवर्धन करताना गडाच्या हेरीटेज स्ट्रक्चरला कुठेही धक्का लागणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. त्याचे भाषण सुरु असतानाच श्रोत्यांमधील एक व्यक्ती उठून उभी राहिली. मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी या व्यक्तीने करताच अजित पवारांनी त्या व्यक्तीला खाली बसायला सांगितले. तसेच ‘तू कोणाची सुपारी घेऊन आलाय का ?’ असे त्या व्यक्तीला खडसावत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का ? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना ? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हीच आमची भूमिका आहे. मात्र, प्रश्न न्यायालयात अडकला आहे. नियमात बदल करून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारकडून नियमातच बदल करावा लागेल असे अजित पवार म्हणाले. शिवनेरी आंब्याला जी आय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

Share This News

Related Post

निवडणुका येतील जातील, अधिवेशनात चांगल्या हेतूनं चर्चा करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

Posted by - January 31, 2022 0
निवडणुकांमुळे संसदेच्या अधिवेशनावर परिणाम होत असतो. चर्चांवर त्याचा परिणाम होत असतो हे खरं असलं तरी निवडणूक येतात आणि जातात. अर्थसंकल्प…
Rishibhai Shinde

आ. शशिकांत शिंदेंचे भाऊ ऋषीभाई शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

Posted by - June 4, 2023 0
सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ आणि माथाडी…

मोठी बातमी! उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Posted by - June 29, 2022 0
मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे जाहीर…
Mumbai Crime News

Mumbai Crime News :काजलचे घराबाहेर सूत जुळलं अन् सासू-नवऱ्याचा केला गेम; पण…

Posted by - October 19, 2023 0
मुंबई : आजकाल पैसा हाती आला कि रक्ताची नातीदेखील एकमेकांच्या जीवावर (Mumbai Crime News) उठतात. याच पैशांपायी गडचिरोलीमध्ये एका सुनेनं…

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला; नाना पटोले यांची राष्ट्रवादीवर टीका

Posted by - May 11, 2022 0
गोंदिया जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असं सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *