अंनिसच्या अध्यक्षपदावरून वाद चव्हाट्यावर, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आक्षेप

47 0

पुणे- संघटनेचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांच्या निधनानंतर नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद आणि मुलगी मुक्ता यांनी 7 कोटींचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या आरोपामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीमधला वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

एन डी पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या जागेवर एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांची निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर गटाने घेतला. मात्र अविनाश पाटील यांनी याला आक्षेप घेतला आहे. अविनाश पाटील यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून संघटनेची बाजू मांडली आहे. या पोस्टमध्ये अविनाश पाटील यांनी मुक्ता आणि हमीद दाभोलकर यांच्या गटावर गंभीर आरोप केले आहेत.

“समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभम निर्माण करुन फसवणूक करणे आहे. नागरिक, प्रसार माध्यमे आणि समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांची ही दिशाभूल आहे. वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या 60 वर्षातील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा.” असे अविनाश पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.facebook.com/avinashpatilmans/posts/5013343498703916

Share This News

Related Post

रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरची जागा, उंची कोण ठरवतं ?

Posted by - November 11, 2022 0
पुणे शहरासह, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील स्पीड ब्रेकरमध्ये अनेकदा फरक असतो. पुणे शहरातील काही भागांमध्ये नियमानुसार स्पीड ब्रेकर तयार करण्यात…

शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी

Posted by - October 19, 2022 0
पुणे : शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत पुणे-अहमदनगर व शिक्रापूर-चाकण मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२२…

#BEAUTY TIPS : डोळ्याखालची काळी वर्तुळ अवघ्या आठ दिवसात जातील; करा फक्त हा घरगुती उपाय

Posted by - January 27, 2023 0
आजच्या स्किन केअर टिपमध्ये आपण पाहणार आहोत डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय करावे. डोळे हा शरीराचा अत्यंत…

नवी दिल्ली : न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी घेतली 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

Posted by - November 9, 2022 0
नवी दिल्ली : न्या.डी.वाय.चंद्रचूड यांनी आज देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *