कमला सिटी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके तर सचिवपदी विश्वास रिसबूड

369 0

पुणे- कात्रज येथील कमला सिटी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेच्या कार्यकारिणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळीं संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके यांची, सचिवपदी विश्वास रिसबूड यांची तर खजिनदारपदी शीतल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कमला सिटी सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र धोंडे यांनी बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये केदार सोनपाटकी, संजय गरुड, सुभाष बोडके, रमेश निकम, दिलीप मावळे, गौरव ठोंबरे, शीतल पवार, विश्वास रिसबूड, निलांबिका शिलवंत, मनीषा गोसावी, नितीन करंडे आणि शिवानी माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांसाठी असणार आहे.

त्यानंतर सोमवारी झालेल्या कार्यकारिणीच्या पहिल्या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके यांची, सचिवपदी विश्वास रिसबूड यांची तर खजिनदारपदी शीतल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष संतोष कुंजीर आणि मावळत्या सचिव सुनंदा होनराव उपस्थित होत्या. यावेळी कुंजीर आणि सुनंदा होनराव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे सूत्रे सोपवली.

यावेळी संतोष कुंजीर आणि सुनंदा होनराव यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. ‘नवीन कार्यकारिणीला आमचे सर्व प्रकारचे सहकार्य राहील’ अशी ग्वाही त्यांनी दिली.’आगामी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सोसायटीचे काम अधिक पारदर्शकपणे करण्यावर भर दिला जाईल. तसेच संस्थेचा कारभार शक्य तेवढा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भावना नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष बोडके यांनी व्यक्त केली.

Share This News

Related Post

पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘या’ 32 पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी !

Posted by - July 2, 2022 0
पावसाळा सुरू झाला आहे. अनेक पर्यटक पावसाचा आनंद लुटण्यासाठी ठिकठिकाणी पर्यटनासाठी गर्दी करत असतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात अनेक दुर्घटना घडल्याचं…

खळबळजनक : पुण्यात बेकायदा वास्तव्य करणारा पाकिस्तानी तरुण विशेष शाखेच्या जाळ्यात; बनावट भारतीय पारपत्र जप्त

Posted by - March 15, 2023 0
पुणे : पुण्यातून आज बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेनं पकडल आहे. महंमद अमान अन्सारी (वय वर्ष 22) असे…
praakash-ambedkar

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची 8 मे रोजी पिंपरी येथे जाहीर सभा

Posted by - May 4, 2023 0
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे भिमसृष्टी येथे सोमवार,…

पिंपरीत अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन टेम्पोचालकाकडून अत्याचार(व्हिडिओ)

Posted by - March 28, 2022 0
पिंपरी- एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन तिच्यावर टँपो चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आली आहे.…

‘अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव…रवींद्र धंगेकरांच्या गाण्याचा धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

Posted by - April 13, 2023 0
काही दिवसांपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे एक रॅपसॉंग खूपच व्हायरल झाले होते. ’50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी’ अशा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *