ऑरलँडो- अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. थीम पार्क मधील एका थरारक खेळाच्या ठिकाणी हा प्रकार घडला.
थीम पार्क आणि त्यातील सर्वप्रकारची मोठमोठी खेळणी लहान मुलांना आणि तरुणांना नेहमीच आकर्षित करतात. कधीकधी सुरक्षेच्या नियमांचे पालन केले नाही तर अशा उंच झुल्यांवर बसणे जीवघेणे ठरू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही. हा अपघात झाला तेव्हा मुलाचे आई-वडील जवळच उभे होते. सुमारे 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने हा मुलगा 430 फूट उंचीवरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येत आहे. थीम पार्क राइड जिथून हा मुलगा खाली पडला त्या खेळाचे नाव आहे, ‘ऑरलँडो फ्री फॉल राइड’.
या घटनेनंतर, मुलाने शरीरावर सुरक्षा बेल्ट बांधला होता, की नाही हे स्पष्ट झाले नाही. रात्री 11 वाजता हा अपघात झाला. त्याचवेळी, उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले, की सुरुवातीला जेव्हा हा मुलगा खाली पडला तेव्हा त्यांना झुल्याचा तुकडा पडल्याचे वाटले, पण नीट बघितल्यावर खाली एक मुलगा पडला होता.
https://twitter.com/Joshuajered/status/1507366705604923394