कमला सिटी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके तर सचिवपदी विश्वास रिसबूड

454 0

पुणे- कात्रज येथील कमला सिटी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेच्या कार्यकारिणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळीं संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके यांची, सचिवपदी विश्वास रिसबूड यांची तर खजिनदारपदी शीतल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कमला सिटी सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र धोंडे यांनी बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारिणी सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये केदार सोनपाटकी, संजय गरुड, सुभाष बोडके, रमेश निकम, दिलीप मावळे, गौरव ठोंबरे, शीतल पवार, विश्वास रिसबूड, निलांबिका शिलवंत, मनीषा गोसावी, नितीन करंडे आणि शिवानी माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षांसाठी असणार आहे.

त्यानंतर सोमवारी झालेल्या कार्यकारिणीच्या पहिल्या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी सुभाष बोडके यांची, सचिवपदी विश्वास रिसबूड यांची तर खजिनदारपदी शीतल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष संतोष कुंजीर आणि मावळत्या सचिव सुनंदा होनराव उपस्थित होत्या. यावेळी कुंजीर आणि सुनंदा होनराव यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे सूत्रे सोपवली.

यावेळी संतोष कुंजीर आणि सुनंदा होनराव यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. ‘नवीन कार्यकारिणीला आमचे सर्व प्रकारचे सहकार्य राहील’ अशी ग्वाही त्यांनी दिली.’आगामी पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सोसायटीचे काम अधिक पारदर्शकपणे करण्यावर भर दिला जाईल. तसेच संस्थेचा कारभार शक्य तेवढा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भावना नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष बोडके यांनी व्यक्त केली.

Share This News
error: Content is protected !!