सोलापुरात बसचा भीषण अपघात; 35 प्रवासी जखमी PHOTO

388 0

सोलापूर : सोलापुरात बसचा भीषण अपघात घडला आहे. 35 प्रवासी घेऊन जाणारी बस उसाच्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना एका बाजूला पलटी झाली. या बसमध्ये 35 प्रवासी होते. सुदैवानं प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात हे घटना घडली असून सुर्डी मालनंजी या गावाजवळ बसला अपघात झाला. उसाच्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना बस चालकाचे नियंत्रण सुटले, आणि बस पलटी झाली. बसचा वेग अधिक नव्हता त्यामुळे प्रवासी बाल बाल बचावले आहेत.

Share This News
error: Content is protected !!