MAHARASHTRA POLITICS : मेघना काकडें माने यांचा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश

599 0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते आज शिवबंधन बांधून अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र. ६० येथील सौ. मेघना काकडे-माने यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.

सौ. मेघना काकडे माने या पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या कन्या आहेत. यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर, आ. रवींद्र वायकर, आ. अनिल परब, आ. सचिन अहिर, भाऊ कोरगावकर, उपनेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होतें.

Share This News
error: Content is protected !!