पुणे : खडकी भागामध्ये दहशत माजवणाऱ्या टोळक्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार सलमान नासिर शेख आणि त्याच्या टोळी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केली आहे. यामध्ये टोळीप्रमुख सन्मान नासिर शेख यांच्यासह हितेश सचिन चांदणे, प्रज्योत उर्फ मोना बाळकृष्ण उमाळे,दीपक राजेंद्र ढोके, शुभम बाळकृष्ण उमाळे, आकाश उर्फ संजय वाघमारे, किरण अनिल खुडे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सलमान शेख आणि त्याच्या टोळक्याविरुद्ध आतापर्यंत मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, दहशत निर्माण करणे, शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्ता अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत करण्यात आलेली ही 106 वी कारवाई आहे.