बडे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 250 तरुणींना फसवणाऱ्या दोन भामट्याना अटक (व्हिडिओ)

344 0

पिंपरी- केंद्र सरकारमध्ये बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल अडीचशे पेक्षा जास्त तरुणींना फसविणाऱ्या आणि त्यांचे शारीरिक शोषण करणाऱ्या दोन भामट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलंय. एका सामाजिक कार्यकर्ता महिलेच्या मदतीने या दोघांना पोलिसांनी अटक केली.

निशांत रमेशचंद नंदवाना आणि हर्षद शर्मा अशी या दोन भामट्यांची नावे आहेत. दोघांच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत रमेशचंद नंदवाना आणि हर्षद शर्मा हे दोघेजण मूळचे राजस्थानमधील असून त्यांनी आजपर्यंत कर्नाटक, महाराष्ट्र, आणि हरयाणा राज्यातील एकूण २५५ मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे तसेच त्यांचे शारीरिक शोषण केले आहे.

कधी अभव कश्यप तर कधी अदीत व्यास… कधी आघव अग्निहोत्री तर कधी अश्विक शुक्ला अशा वेगवेगळ्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून केंद्र सरकारच्या विविध खात्याचे बनावट आयकार्ड तयार करून हे दोन भामटे मेट्रोमोनीयल साईटवर आपली माहिती द्यायचे. त्यांच्याशी संपर्क केलेल्या मुलींशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचे.

पुण्यती सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांच्याशी काही पीडित तरुणींनी संपर्क साधला असता धारणे यांनी त्यांची सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी धारणे यांनी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या दोघांना अटक केली. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पिंपरी-चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

Posted by - March 29, 2022 0
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते…
Sant Tukaram

देहू ते पंढरपूर वारीमध्ये‘आनंदडोह – आनंदवारी’ संपन्न होणार!

Posted by - June 5, 2023 0
पुणे : देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोबत यंदा जगद्गुरू संत तुकारामांचे जीवन एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा ‘आनंदडोह – आनंदवारी’…

Mumbai to Ahmedabad : बुलेट ट्रेन 2026 पर्यंत धावणार

Posted by - July 21, 2022 0
मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान होताच बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत पुन्हा…
Ajit Pawar

Ajit Pawar : मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजितदादांनी माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम केला रद्द

Posted by - October 28, 2023 0
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *