पिंपरी- चिंचवड शहरात कोयता गँगने दुकानात घुसून पळवले ब्रँडेड कपडे

510 0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात ब्रॅण्डेड कपडे घालण्यासाठी पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालत रेडीमेड दुकानात कपड्यांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हाणे वस्ती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वीही कोयता गँगने पिंपरीतील एम जी शुज शॉप मध्ये देखील शूज चोरी करण्यासाठी दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करुन मोठी तोडफोड केली होती. काल पुन्हा चिखली येथिल ताम्हाणे वस्ती येथील पीसीएमसी फॅशन हब या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसून दुकान मालकाच्या आईवर कोयता गँगने वार करुन सात हजार पाचशे रूपये किमतीचे तीन शर्ट आणि तीन जिन्स पळविले आहेत.

कोयता गँगच्या हल्ल्यात कुसुम ईश्वर नागरगोजे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात उदयास आलेल्या छोट्या छोट्या कोयता गँगमुळे पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share This News
error: Content is protected !!