पिंपरी- चिंचवड शहरात कोयता गँगने दुकानात घुसून पळवले ब्रँडेड कपडे

394 0

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात ब्रॅण्डेड कपडे घालण्यासाठी पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालत रेडीमेड दुकानात कपड्यांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हाणे वस्ती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वीही कोयता गँगने पिंपरीतील एम जी शुज शॉप मध्ये देखील शूज चोरी करण्यासाठी दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करुन मोठी तोडफोड केली होती. काल पुन्हा चिखली येथिल ताम्हाणे वस्ती येथील पीसीएमसी फॅशन हब या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसून दुकान मालकाच्या आईवर कोयता गँगने वार करुन सात हजार पाचशे रूपये किमतीचे तीन शर्ट आणि तीन जिन्स पळविले आहेत.

कोयता गँगच्या हल्ल्यात कुसुम ईश्वर नागरगोजे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात उदयास आलेल्या छोट्या छोट्या कोयता गँगमुळे पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share This News

Related Post

महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला – चंद्रकांत पाटील

Posted by - May 4, 2022 0
कोल्हापुर- ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले असून शिवसेना – काँग्रेस –…
Nashik News

Nashik News : संतापाच्या भरात लिव्ह-इन पार्टनरकडून महिलेची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 17, 2023 0
नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) आरोपीने संतापाच्या भरात आपल्या लिव्ह…
Crime

कर्मचाऱ्यासोबत वाद झालेला वाद मिटवायला गेला आणि जीवाला मुकला

Posted by - June 30, 2023 0
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांसोबत झालेला वाद सोडवून मॅनेजरच्या जीवावर बेतलं आहे. किरकोळ वादातून चक्क…

पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेल्या चंद्रकांत पाटलांचा कसा आहे राजकीय प्रवास

Posted by - September 25, 2022 0
शनिवारी रात्री उशिरा जिल्हा निहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *