पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्या रॅलीमध्ये फायरिंग दरम्यान इमरान खान जखमी झाले आहेत.त्यासह अन्य चार जण देखील जखमी झाले असल्याचे समजते आहे. प्रकरणी पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेतले आहे. माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्यावर लाहोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितल आहे.
सध्या माजी प्रधानमंत्री इमरान खान हे पाकिस्तानमध्ये आजादी रॅली काढत आहेत. पाकिस्तान मधील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली जात आहेत. या रॅली दरम्यान गुरुवारी अचानक फायरिंग सुरू झाली. या फायरिंगमध्ये इमरान खान जखमी झाले आहेत. त्यासह माजी राज्यपाल इमरान इसमेल हे देखील जखमी झाले असल्याचे समजते.
या फायरिंगमध्ये इमरान खान यांना पायांमध्ये गोळी लागली आहे. AK 47 सारख्या रायफलने ही फायरिंग करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. फायरिंग करणाऱ्या या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.