ANDEKAR GANG EXTORTION: आंदेकर गॅंगनं व्यावसायिकाकडून घेतला 48 लाखांचा हप्ता;नवा टोळीप्रमुख शिवम आंदेकरला अटक

102 0

ANDEKAR GANG EXTORTION: पुण्यातील कुख्यात आंदेकर गॅंग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कारण आहे खंडणीचं.. आंदेकर गॅंग एका मच्छी व्यवसायिकाकडून तब्बल आठ वर्षांपासून खंडणी उकळत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ANDEKAR GANG EXTORTION:

या प्रकरणी गॅंगचा नवा म्होरक्या शिवम आंदेकर याला अटक करण्यात आली आहे.

BREAKING NEWS : खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील कुख्यात आंदेकर गॅंगवर गुन्हा दाखल, गॅंगचा प्रमुख शिवम आंदेकरसह 6 जणांवर गुन्हा
आंदेकर कुटुंब पुण्यातील ज्या भागात वास्तव्यास आहे, तिथून अगदी जवळच असलेल्या गणेश पेठ परिसरात पुण्यातील प्रसिद्ध मच्छी मार्केट आहे.

या मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत

दरमहा 50 हजार रुपये हप्ता देण्याची मागणी या आंदेकर गॅंगचा नवा म्होरक्या शिवम आंदेकर याने 2016 मध्ये केली होती.

घाबरलेल्या व्यावसायिकाने हप्ता द्यायला सुरुवात केली.

VANRAJ ANDEKAR MURDER : वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार शिवम आंदेकर यांच्या जीवाला धोका ? पोलीस संरक्षणही दिले

शिवमचा साथीदार असलेला आकाश परदेशी हा गेले आठ वर्ष या मच्छी व्यवसायिकाकडून दर महिन्याला 50 हजार रुपये उकळतो.

गेल्या आठ वर्षात जवळपास 48 लाख रुपये या व्यवसायिकाने आंदेकर गॅंगला दिले. मात्र अखेर, या व्यवसायिकाने हप्ता देणं बंद केला. त्यावर शिवम आंदेकर, आकाश परदेशी आणि त्यांच्या साथीदारांनी व्यावसायिकाच्या दुकानात घुसून गोंधळ घातला. दुकानातील ९० हजार रुपयांचं साहित्य बाहेर फेकून दिलं आणि नंतर तेच साहित्य जबरदस्तीने टेम्पोमध्ये भरून घेऊन गेले.

जाताना या व्यवसायिकाला धमकी की देण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला.

तर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिवम आंदेकर, आकाश परदेशी आणि इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Vanraj Andekar Murder | वनराज आंदेकर हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपींना घेतलं ताब्यात 

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे पुण्यातील कुख्यात गुंड आणि त्यांच्या टोळ्यांची सर्वसामान्य माणसांमध्ये किती दहशत आहे, आणि त्यांच्या दहशतीलाच बळी पडून पोलिसांच्या नजरेआड लाखो रुपयांची हप्ते वसुली कशी केली जाते, हे पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे. त्यामुळेच पोलिसांकडून या प्रकरणात गंभीरतेने कारवाई केली जात आहे.

VANRAJ ANDEKAR MURDER: वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी आणली परराज्यातून शस्त्रे; पोलीस तपासात धक्कादायक माहित

Share This News
error: Content is protected !!