पुणे -मुंबई महामार्गावर तळेगावजवळ पिकअप-ट्रकचा अपघात, महामार्गावर केळीच केळी

202 0

तळेगाव- जुन्या पुणे -मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे जवळ पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप टेम्पोने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातानंतर महामार्गावर केळीच केळी विखुरली गेली. सुदैवाने या अपघातात कोणीही जीवितहानी झाली नाही.

हा अपघात आज सकाळी झाला. पुण्यावरून मुंबईकडे केळी घेऊन जाणारा पिकअप टेम्पो (एम एच ४५ ए एफ ६२३३) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून जाणाऱ्या ट्रक वर धडकला. या अपघातानंतर महामार्गावर केळ्यांचा अक्षरशः खच पडला. या केळ्यांवरून वाहने घसरण्याची भीती असल्याने दुसरी कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये. यासाठी तळेगांव दाभाडे पोलिसांनी प्रसंगावधान राखत आय आर बी देवदूत रेस्क्यूला पाचारण केले. अपघाताचे ठिकाण स्वच्छ करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Share This News

Related Post

Crime

धक्कादायक : कुऱ्हाडीने वार करून दोन अज्ञात आरोपींनी पेट्रोल पंपावर घातला दरोडा ; थरकाप उडवणारा व्हिडिओ

Posted by - August 23, 2022 0
पुणे : पुण्यातील न-र्हे भागामध्ये सोमवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी थेट पेट्रोल पंपावर दरोडा घातला. या दरोडेखोरांकडे एक कुऱ्हाड होती. या कुऱ्हाडीचाच…

संविधान दिनाच्या निमित्ताने तृतीयपंथी मतदार नोंदणी कार्यक्रम

Posted by - November 26, 2022 0
पुणे : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित…

भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची सामना सुरू असतानाच गोळ्या घालून हत्या

Posted by - March 15, 2022 0
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल (वय-३८) याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात…

पुणे पोलीस दलात महत्त्वाचे आणि मोठे बदल; 16 पोलीस अधिकाऱ्यांच्या पुण्यात बदल्या, वाचा सविस्तर

Posted by - November 8, 2022 0
पुणे : गृह विभागाने राज्यातील पोलीस अधिकारी दर्जाच्या १०४ बदल्या घोषित केल्या आहेत. यामध्ये अप्पर अधीक्षक , पोलीस अधीक्षक यांच्या…

T20 World Cup : शोएब अख्तर म्हणे,”पुढच्या आठवड्यात भारतीय टीमची बॅकपॅक होईल…!” पहा VIDEO

Posted by - October 28, 2022 0
पाकिस्तान : T20 वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला अत्यंत निराशा पदरी पडली आहे. पराभवामुळे पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. झिंबावे सारख्या टीमने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *