पुणे – ज्योतिबांच्या कामाला सावित्रीबाईंनी सामाजिक साथ दिली. त्या स्वतःही कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्योतिराव गेल्यांनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांचे नेतृत्व केले. असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित राहून फडणवीस यांनी अँलूं भावना व्यक्त केल्या. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यातून व मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरु डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चाकणे,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पुरुषाच्या यशात स्त्रीचा वाटा असतो. याचे आद्य उदारहण सावित्रीबाई फुले यांचे आहे. अर्थातच स्त्रीच्या पाठिशी पुरुषही भक्कमपणे उभा राहतो. याचे श्रेय ज्योतिबांना द्यावे लागेल. ज्योतिबांच्या कामाला सावित्रीबाईंनी सामाजिक साथ दिली. त्या स्वतःही कृतीशील समाजसुधारक, दृष्ट्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. ज्योतिराव गेल्यांनंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांचे नेतृत्व केले. ज्योतिरावांनी उभ्या देशाला संघर्ष शिकवला. त्यामुळे बाबासाहेबांनी फुल्यांना गुरुस्थानी मानले.
या अगोदर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिवशी म्हणजे 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव हा पुढे ढकलण्यात आला होता. कात्रज पुणे येथे परदेशी स्टुडिओत सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा बनवण्यात आला आहे. अतिशय भव्यदिव्य पुतळ्याची उंची 12 फूट आहे.