South Africa Team

World Cup 2023 : दक्षिण आफ्रिका संघाला लागली लॉटरी; थेट वनडे वर्ल्डकपसाठी ठरला पात्र

3000 0

मुंबई : दक्षिण आफ्रिका संघ यावर्षी भारतामध्ये खेळवल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी (World Cup 2023) पात्र ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी एकूण आठ संघ पात्र ठरणार होते. यामधील सात संघ आधीच निश्चित झाले होते. आता दक्षिण आफ्रिका संघ (South Africa) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा 8 वा संघ ठरला आहे. आयर्लंड (Ireland) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर दक्षिण आफ्रिका विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

ICC ODI Rankings : पाकिस्तानला मोठा धक्का! अवघ्या 48 तासांत पाकिस्तानने गमावले पहिले स्थान

दक्षिण आफ्रिकेला लागली लॉटरी
आयर्लंड आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना काल पावसामुळे रद्द झाला. हा सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला आहे. या मालिकेतील तीनही एकदिवसीय सामने आयर्लंडने जिंकले असते, तर आयर्लंडचा संघ या वर्ल्डकपसाठी पात्र ठरला असता. पण एक सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला याचा फायदा झाला आहे.

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपमध्ये के. एल. राहुलच्या जागी मुंबईच्या ‘या’ खेळाडूला देण्यात आली संधी

विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार
भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये 8 संघांची नावे निश्चित झाली आहेत. यामध्ये इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. उर्वरित 2 संघ पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत सामील होतील. या 2 संघांमध्ये वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांचा समावेश होऊ शकतो.

Share This News
error: Content is protected !!