पुणे : पुणे पोलिस क्राईम ब्रँचने एक धडक कारवाई करत गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्या एका तरुणाला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 21 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने हि कारवाई केली आहे. मुकेश बबन मुने Mukesh Baban Mune (26, रा. सुतारदरा, कोथरूड – Sutardara Kothrud) आणि त्याचा मित्र नितीन सुरेश बागडे Nitin Suresh Bagde (32, रा. कवडे गल्ली, नालेगाव, जि. अहमदनगर – Ahmednagar) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नितीन बागडे हा चोरलेले सोने अहमदनगर येथील ओळखीच्या सोनारांना विकत होता. तर दुसरा आरोपी मुकेश मुने हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द आतापर्यंत तब्बल 35 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas kadam), सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश लोहोटे (API Avinash Lohote), पोलिस अंमलदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, दयाराम शेगर, राहुल ढमढेरे, प्रमोद टिळेकर आणि संजयकुमार दळवी यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे.