चेन्नई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) आज एकमेकांना भिडणार आहेत. चेन्नईत होणाऱ्या या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू एडम झाम्पाला दुखापत झाल्याचे समजत आहे. झाम्पाला झालेली दुखापत गंभीर नसल्याचे टीम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले आहे. तो भारताविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी दीड वाजता टॉस होईल. दोन्ही संघाचा विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघ विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.
विश्वचषकासाठी दोन्ही संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.