बारामती : बारामतीमधून (Baramati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याला मृत्यू कधी आणि कसा येईल हे काही सांगता येत नाही. या गोष्टीचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. यामध्ये रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेली त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.
काय घडले नेमके?
बारामती शहारातील एका खसागी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतत असताना अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असलेली त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. तेजस विजय कासवे (वय 21 वर्ष) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर राधिका कासवे असं जखमी झालेल्या आईचे नाव आहे.
तेजसवर बारामतीमधील एका खसागी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळाला. तो रिंगरोडवरून आपल्या आईसोबत दुचाकीवरून घरी परतत होता. मात्र याचवेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव हायवाने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे कासवे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई आणि मुलाचा असा दुर्दैवी अपघात झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.