Shreyanka Patil

Shreyanka Patil : भारताच्या श्रेयांका पाटीलने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली गोलंदाज

1542 0

नवी दिल्ली: भारताची युवा ऑफ स्पिनर श्रेयांका पाटील (Shreyanka Patil) सध्या वेस्ट इंडिजमध्ये महिला कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत आहे. श्रेयांका (Shreyanka Patil) अमेझॉन वॉरिअर्स संघाकडून खेळत आहे. या लीगमध्ये खेळणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. विशेष म्हणजे श्रेयांकाने अद्याप भारताकडून पदार्पण केले नाही. ती भारताची अशी पहिली महिला खेळाडू आहे जिने देशासाठी पदार्पण न करता परदेशातील लीगमध्ये खेळत आहे.

श्रेयांकाने महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये तिच्या गोलंदाजीच्या जोरावर इतिहास रचला आहे. तिने अशी कामगिरी केली जी आजवर सीपीएलमध्ये कोणत्याच खेळाडूला करता आलेली नाही.21 वर्षीय श्रेयांका पाटीलने गुयाना एमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना बारबाडोस रॉयल्सविरुद्ध विक्रमी कामगिरी केली. सीपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी स्पेल टाकण्याची कामगिरी श्रेयांकाने केली आहे.

भारताच्या या युवा क्रिकेटपटूने 4 षटकात 8.50 च्या इकॉनमीने 34 धावा देत 4 मोठ्या विकेट घेतल्या. श्रेयांकाने कर्णधार हेली मॅथ्यूज, रशादा विलियम्स, आलिया आणि चेडियन नेशन यांना बाद केले. महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 4 विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली आहे. पण तिच्या या धमाकेदार कामगिरीनंतर देखील संघाला विजय मिळवता आला नाही. रॉयल्सने ही लढत ३ विकेटनी जिंकली. अमेझॉन वॉरिअर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 146 धावा केल्या. बारबाडोसने हे लक्ष्य 3 विकेट आणि 2 चेंडू राखून पार केले.

Share This News
error: Content is protected !!