भारताचे बॅडमिंटनपटू (Badminton) सात्विक साईराज रंकिरेड्डी (Satwik Sairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी इंडोनेशिया ओपनचं (Indonesia Open) विजेतेपद जिंकत मोठा इतिहास रचला आहे. इंडोनेशिया ओपन (Indonesia Open) मधील पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत त्यांनी मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यिकला या जोडीचा 21-17, 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम ! ‘या’ खेळाडूने घेतल्या एकाच षटकात 6 विकेट्स
सात्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचं हे पहिलं सुपर 1000 वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. मलेशियाच्या जोडीविरुद्ध 7 वेळा पराभव झाल्यानंतर हा भारताचा पहिला विजय आहे. आरोन चिया आणि सोह वुई यिक यांची जोडी पुरुष दुहेरीत वर्ल्ड चॅम्पियन आहे.
क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यामुळे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या
भारताच्या सात्विक आणि चिराग जोडीने पहिला गेम जिंकला होता. पण त्यानंतर मलेशियाच्या जोडीने सामन्यात आक्रमक सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्याकडे आघाडी होती. पण भारताच्या जोडीने पुन्हा मुंसडी मारत सामन्यात (Indonesia Open) पुनरागमन केलं. त्यानंतरही लढत खूपच अटी तटीची झाली होती. अखेर या अटीतटीच्या लढतीमध्ये भारताने बाजी मारली.