नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या संजय सिंह यांचा विजय झाल्यानंतर निराश झालेल्या साक्षीने कुस्तीमधून निवृत्ती (Sakshi Malik Retirement) घेत असल्याचे जाहीर केले. साक्षीने रिओ ऑलिंपिकमध्ये कुस्तीत देशाला पदक जिंकून दिले होते.
WFIच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संजय सिंह आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती अनीता श्योराण यांच्यात लढत होती. निकालात संजय सिंह यांचा विजय झाला. हा विजय माजी अध्यक्ष बृज भूषण सिंह यांचा विजय असल्याचे मानले जात आहे. संजय सिंह हे बृज भूषण सिंह यांच्या जवळचे आहेत. या निकालानंतर साक्षीने निराश होऊन निवृत्ती जाहीर केली आहे.
संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे दीर्घकाळचे सहकारी आहेत, जे 12 वर्षे WFI प्रमुख होते. साक्षी मलिकसह आघाडीच्या कुस्तीपटूंनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर उत्तर प्रदेशचे भाजपचे सहा वेळा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. निवडणुकीत संजय सिंह यांना 47 पैकी 40 मते मिळाली. डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षपदासाठी विरोधक कुस्तीपटूंची निवड झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अनीता श्योराणला केवळ 7 मते मिळवता आली. देशातील अव्वल कुस्तीपटू, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी निकालाबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nashik Video : हातात तलवार घेऊन गुंडाचा झेरॉक्स दुकानावर हल्ला; नाशिकमधील घटना
Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर
Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या
Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार
Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड