अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना जाहीर

474 0

पुणे: भारताचे पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी हे प्रखा राष्ट्रप्रेमी तसेच संवेदनशील मनाचे कवीही होते. भारत वर्षाचे राजकारणी कमी अन सुसंस्कृतिक दूत म्हणून अधिक अशी त्यांच्या व्यक्तीमत्वाची जगभरात अन जनमानसात ओळख आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे त्यांचे पुण्याशी एक वेगळे नातं होते. अशा अटलजींच्या स्मृती चिंरतन ठेवण्याच्या उद्देशाने संस्कृती प्रतिष्ठान दरवर्षी समाजातील मान्यवरांना अटल संस्कृती पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करते. यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांना देण्यात येणार आहे, अशी महिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुण्याचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, यंदाचे वर्ष हे अटलजींचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधून स्व. अटलजींच्या जयंतीदिनी म्हणजे २५ डिसेंबरला हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, बालगंर्धव रंगमंदीरात सायं. ५ वाजता होणा-या समारंभारत प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा, चंद्रकांतदादा पाटील उपस्थित रहाणार आहेत. अटलजींनी अनेक सभा पुण्यात गाजवल्या आहेत. पण त्याच बरोबर अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाचेही कार्यक्रम याच पुण्यात त्यांच्या हस्ते झाले आहेत. त्यांनी प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेतही केलेली भाषणे आजही पुणेकरांच्या स्मरणात आहेत, याशिवाय गदिमा व सुधीर फडके यांच्या गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव, सवाई गंधर्व महोत्सव, सुवर्ण महोत्सव याच सांस्कृतिक राजधानीत स्व. अटलजींच्या विशेष उपस्थित साजरा झाला. मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्व. अटलजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने स्व. अटलजींच्या स्मृती जागवणारा त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित कार्यक्रम “आओ फिरसे दिया जलाएँ ” पुरस्कार वितरणानंतर सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून कार्यक्रमाचे संहिता ज्येष्ठ पत्रकार व्यासंगी विजय कुवळेकर यांनी लिहिली आहे. दृकश्राव्य, संगीत, नृत्याविष्कार असा हा कार्यक्रम पुरस्कार वितरण समारंभानंतर हा कार्यक्रम होणार आहे.

स्व. अटलजींच्या निधनानंतर संस्कृती प्रतिष्ठानने त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन गौरवण्यास सुरूवात केली. पुरस्कारचे हे पाचवे वर्ष असून पहिला पुरस्कार विद्यावाचस्पती डॉ. शंकरजी अभ्यंकर यांना देण्यात आला. त्यानंतर डॉ. शां. ब. मुजुमदार, जेष्ठशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथजी माशेलकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदाच्या पुरस्काराचे किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी हे मानकरी आहेत. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, मानपत्र, स्मृती चिन्हं, शाल आणि श्रीफळ असे आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलजींच्या जीवन प्रवास आणि कवितांवर आधारित संवाद पुणे निर्मित हा कार्यक्रम आओ फिरसे दिया जलाएँ, सादर करण्यात येणार आहे. यात दृकश्राव्य कार्यक्राबरोबरच हिंदी नाट्य चित्रपट अभिनेते मनोज जोशी हे अटलजींच्या निवडक कवितांचे वाचन करतील. पार्श्वगायिका बेला शेंडे आणि अभय जोधपूरकर हे स्वरबद्ध गाणी सादर करतील तर सुखदा खांडकेकर आणि नुपूर दैठणकर या नृत्याविष्कार सादर करतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी करणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन व नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे.

तसेच या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कलांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे शिल्पकला, चित्रकला, रंगावली, कॅलीग्राफी, फोटोग्राफी अशा विविध कलेच्या संगमेतून अटलजींचे स्मरण ” अटलपर्व ” या भव्य प्रदर्शनीतून होणार आहे. याचे उद्घाटन प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या शुभहस्ते व पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांच्या उपस्थित होणार आहे. दिनांक २५ डिसेंबर सकाळी ११ वाजता हे उद्घाटन होणार आहे. अशी महिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुण्याचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!