lasith-malinga

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मलिंगा पुन्हा एकदा मुंबईकडून खेळणार

1054 0

मुंबई : सध्या भारतात वर्ल्ड कप 2023 सुरु आहे. भारत यंदा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत. अशातच आता आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यॉर्कर किंग लसिथ मलिंगा पुन्हा एकदा मुंबईच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. मात्र यावेळी तो वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

लसिथ मलिंगा याला लॉटरी लागली असून त्याने मुंबई इंडियन्सला अनेक सामने एकहाती जिंकुन दिले आहेत. मलिंगाची मुंबई इंडियन्सच्या मुख्य गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने मलिंगाकडे आता गोलंदाजीची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड होण ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मार्क बाऊचर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया लसिथ मलिंगा यांनी दिली आहे.

लसिथ मलिंगा आधी राजस्थान रॉयल्स संघामध्ये कोचिंगची जबाबदारी पाहत होता. मुंबईला मलिंगाने अनेक सामने जिंकले असून स्ट्राईक बॉलर म्हणून त्याने मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. मुंबईकडून खेळताना प्रत्येक मोसमामध्ये मलिंगाने आपली जबाबदारी चोख पार पाडली. मलिंगाने मुंबईसाठी 139 सामने खेळले आणि 7.12 च्या इकॉनॉमीने 195 विकेट घेतल्या.

Share This News
error: Content is protected !!