Mohammad Siraj

Mohammad Siraj : मोहम्मद सिराज वनडे मालिकेतून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय

509 0

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. तो आपल्या मायदेशी परतला आहे. एकदिवसीय मालिकेत सिराजची (Mohammad Siraj) निवड झाली होती, पण त्याला संघ व्यवस्थापनाने अचानक विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह हा अजूनही फिट नसल्यामुळे आगामी वर्ल्डकपमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद सिराजच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोहम्मद सिराजने पहिल्यांदा कसोटीत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. डॉमनिका कसोटीतही त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. तर अश्विनने 15 विकेट घेतल्या होत्या. भारताकडून अश्विननंतर डॉमनिका कसोटीत सिराजने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. वर्कलोडच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सिराजला वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी कोणाला संधी देण्यात येणार याची मात्र अजून घोषणा करण्यात आली नाही.

Babar Azam: श्रीलंकाविरुद्ध सामन्यात बाबर आझमने खेळला ‘तो’ ‘युनिक शॉट’ सोशल मीडियावर व्हायरल

मोहम्मद सिराज वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेचा भाग नव्हता. दोन कसोटीत त्याने 7 विकेट घेतल्या होत्या. पोर्ट ऑफ स्पेनच्या पाटा खेळपट्टीवर त्याने पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यासोबत कसोटी संघातील आर अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी हेदेखील मायदेशी परतले आहेत.

Share This News
error: Content is protected !!